♦️ NEET (UG) – 2026

📢 आधार अपडेट संदर्भात महत्त्वाची सूचना
लवकरच NEET-2026 ची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आधार कार्डवरील माहिती वेळेत अपडेट करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
आधार अपडेट करताना खालील महत्त्वाच्या बाबी काळजीपूर्वक तपासा👇
🔹 आधार अपडेट करताना घ्यावयाची काळजी
(1) विद्यार्थ्यांनी 10 वीच्या गुणपत्रिका / सनद प्रमाणे आधारवरील नाव अचूक असावे याची खात्री करावी.
(2) जर 10 वीच्या गुणपत्रिका/सनद मध्ये आडनाव (Surname) सुरुवातीला असेल, तर आधार कार्डवरही तसेच अपडेट करून घ्यावे.
(3) 10 वीच्या गुणपत्रिका/सनद प्रमाणे आधारवरील नावातील स्पेलिंगच्या चुका दुरुस्त करून घ्याव्यात.
(दोन्ही कागदपत्रांतील माहिती एकसारखी असणे आवश्यक आहे.)
(4) 10 वीच्या गुणपत्रिका/सनद प्रमाणे आधारवरील जन्मतारखेची (Date of Birth) अचूक दुरुस्ती करून घ्यावी.
(5) आधार कार्डवरील फोटो ओळखता येण्यासारखा नसेल, तर फोटो देखील अपडेट करून घ्यावा.
(6) OTP Authentication साठी आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक करून घेणे आवश्यक आहे.
(7) CBSE बोर्ड अंतर्गत 10 वी / 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि Board Certificate वेगवेगळे मिळत नाहीत.
➡️ त्यांची गुणपत्रिकाच Board Certificate म्हणून ग्राह्य धरली जाते.
(8) जे मागासवर्गीय विद्यार्थी (SC / ST / OBC) केंद्रीय प्रवेश प्रक्रिया किंवा महाराष्ट्राबाहेरील प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणार आहेत, त्यांना:
- Central Caste Certificate
- Central NCL Certificate
काढणे आवश्यक आहे.
➡️ राज्य व केंद्रीय प्रमाणपत्रांचे Format वेगवेगळे असतात, याची नोंद घ्यावी.
(9) Central Caste व Central NCL Certificate ची Validity 31 मार्चपर्यंतच असते.
➡️ त्यामुळे 2026–27 शैक्षणिक वर्षासाठी प्रमाणपत्र 1 एप्रिल 2026 नंतरचे असणे आवश्यक आहे.
(10) जे विद्यार्थी फक्त महाराष्ट्र राज्यातील प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणार आहेत, त्यांना नवीन Caste Certificate काढण्याची आवश्यकता नाही.
➡️ मात्र NCL Certificate व Income Certificate 1 एप्रिल 2026 नंतर पुन्हा काढावे लागेल.
⚠️ महत्त्वाची सूचना
वरील सर्व बाबी वेळेत पूर्ण करून दुरुस्त करून घ्याव्यात, कारण आधारमधील माहिती अपडेट होण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो.
📍 Arjuna Career Counselling
📞 9577851212
